मेगाभरती!! १५ ऑगस्ट पूर्वी ७५००० हजार पदे भरली जाणार.
जिल्हा परिषदेची १९००० हजार पदे भरली जाणार.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदांची भरती करणार आहे. १५ ऑगस्टपूर्वी ही पदे भरली जाणार असून सर्व जिल्हा-परिषद मधील ‘गट-क’ संवर्गातील १८ हजार ९३९ पदे एकावेळी भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. आयबीपीएस व टीसीएस या खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

ZP-BHARTI-2023

आनंदाची बातमी
१२ एप्रिलला ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत.
वयोमर्यादेत सवलत
६ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये सरळसेवेच्या भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल केली आहे.तसेच मार्च २०१९च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षा देऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ‘आयबीपीएस’कडून उमेदवारांसाठी ‘ॲप्लिकेशन पोर्टल’ विकसित केले जात आहे. त्यासंबंधाने पुढील काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या पद भरतीसंदर्भातील जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
जिल्हा परिषद भरतीसाठी आता हेल्पलाईन
सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील पदभरतीसंदर्भातील संक्षिप्त टिप्पणी तायर करून पदभरतीबाबत शासनाने केलेली कार्यवाही, जिल्हा परिषदांकडून सुरु असलेली कार्यवाही व पदभरतीची सद्य:स्थिती याची माहिती सर्वांनाच द्यावी. आगामी काळातील परीक्षेचा ‘ॲक्शन प्लॅन’ सर्वांनाच दिसेल, अशा भागात लावावा. उमेदवारांना पदभरतीसंदर्भातील काही माहिती किंवा शंका असल्यास त्याचे निरसन व्हावे म्हणून स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करावी. परीक्षा होऊन त्या उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत हेल्पलाईन सुरुच असावी, असेही आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- परिपत्रक पहा येथे क्लिक करा