ITI प्रवेश 2025 साठी महत्त्वाची माहिती
(तुमचं भविष्य घडविण्याची पहिली पायरी!)
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2025 सत्रासाठी सुरू झाली आहे. प्रवेशासाठी संपूर्ण प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पडणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:
15 मे 2025 पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
iti admission 2025
अर्ज कसा भराल?
उमेदवाराने प्राथमिक माहिती भरून प्रवेश खाते (Admission Account) तयार करावे.
एकच अर्ज भरावा, एकापेक्षा अधिक अर्ज रद्द होतील.
प्राथमिक मोबाईल नंबर अनिवार्य आहे. एक नंबर – एक अर्ज.
अर्ज भरून झाल्यावर प्रवेश शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
अर्जाचा प्रिंटआऊट काढून, आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शासकीय / खाजगी ITI संस्थेमध्ये पडताळणीसाठी सादर करावा.
प्रवेश शुल्क:
राखीव प्रवर्ग: ₹100 / अराखीव प्रवर्ग: ₹150
इतर राज्यांतील विद्यार्थी: ₹300 / NRI विद्यार्थी: ₹500
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज व पडताळणी प्रक्रिया – 15 मे 2025 पासून
प्रथम फेरीसाठी विकल्प सादर करणे – 26 मे 2025 पासून
आवश्यक कागदपत्रे:
10वीचे गुणपत्रक, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागल्यास),इतर संबंधित कागदपत्रे
काही विशेष बाबी:
काही खास अभ्यासक्रमांमध्ये PPP (Public Private Partnership) अंतर्गत जागा उपलब्ध आहेत.प्रवेशासाठी पात्र संस्था, अभ्यासक्रम आणि NCVT मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.प्रवेशासाठी कोणतेही शुल्क कोणत्याही संस्थेकडे भरायचे नाही. अनधिकृत शुल्क आकारल्यास हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
संपर्क व मार्गदर्शन:
प्रत्येक ITI संस्थेत दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी माहितीपुस्तिका जरूर वाचा
(महिती पुस्तिका पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या)
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
—
तुमच्या कारकिर्दीची घडी घालण्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नका! ITI प्रवेश 2025 साठी आजच अर्ज करा आणि तुमच्या भविष्यातील यशाची वाट मोकळी करा.