डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषात बदल तसेच नवीन घटकांचाही समावेश!
नवीन विहीरीसाठी मिळणार ४ लाख रुपये अनुदान !
![]() |
krushi swavlamban yojana |
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन दि.५ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये विशेष घटक योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रु. १.५० लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याऱ्यांना “नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप सच, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान देण्यात येते.
dr babasaheb ambedkar krushi swavlamban yojana navin vihir
सदर योजनेचे आर्थिक निकष सन २०१७-१८ मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत विविध घटकांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली व मा. मंत्री (आदिवासी विकास विभाग) यांच्या उपस्थितीत दि.१०.०१.२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सदर योजनेचे घटकनिहाय आर्थिक मापदंड वाढविणे, निकषामध्ये सुधारणा करणे व नवीन घटकाचा समावेश करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुषंगाने या योजनेचे घटकनिहाय आर्थिक मापदंड वाढविणे, निकषांमध्ये सुधारणा करणे व नवीन घटकांचा समावेश करण्यास दि.३० सप्टेंबर, २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आलेली आहे, त्याअनुषंगाने शासन पुढील निर्णय घेत आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास व योजनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
dr babasaheb ambedkar krushi swavlamban yojana
अ.क्र.
|
बाब
|
अनुदान मर्यादा (रुपये |
१. |
नवीन सिंचन विहीर
|
४००००० |
२. |
जुनी विहीर दुरूस्ती
|
१००००० |
३. |
शेततळ्याचे अस्तरीकरण प्लॅस्टिक |
प्रचलित आर्थिक मापदंड |
४. |
इनवेल बोअरिंग |
४०,०००
|
५. |
वीज जोडणी आकार
|
२०,००० किंवा प्रत्यक्ष भरलेला
|
६. |
विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन (नवीन बाब)
|
१० अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक
|
७. |
सोलार पंप (वीज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी)
|
प्रचलित आर्थिक मापदंडाच्या |
८. |
एचडीपीई / पीव्हीसी पाईप (नवीन बाब)
|
प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या
|
९.
|
सुक्ष्म सिंचन संच
|
|
१०. |
तुषार सिंचन संच
|
प्रचलित आर्थिक मापदंडाच्या
|
११. |
ठिबक सिंचन संच |
प्रचलित आर्थिक मापदंडाच्या |
१२. |
तुषार सिंचन संच पुरक अनुदान
|
प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत |
१३. |
ठिबक सिंचन संच पुरक अनुदान
|
प्रति थेंब अधिक पीक योजनेतर्गत |
१४. |
यंत्रसामुग्री (बैलचलित /ट्रॅक्टर चलित अवजारे) (नवीन
|
५०,००० |
१५. |
परसबाग (नवीन बाब) |
५००० |