वसई-विरार महापालिकेत वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्णसंधी: विविध पदांसाठी थेट मुलाखती
NUHM recruitment Maharashtra 2025
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) विविध वैद्यकीय पदांच्या भरतीसाठी एक मोठी भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या भरतीत MBBS, BDS, आयुष, GNM, B.Sc नर्सिंग, D.Pharm, B.Pharm, DMLT आणि विविध इतर आरोग्य विषयक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची ११० इतकी पदे भरली जाणार आहेत.
पदांचा खालीलप्रमाणे तपशील आहे
उपलब्ध पदे आणि आवश्यक पात्रता:
अर्ध वेळ / पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी अनुक्रमे २० आणि १३ जागा आहेत इतर पदांची माहिती खालील प्रमाणे.
पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता | मानधन (रु.) |
---|---|---|---|
वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 37 | MBBS (MCI/MMC नोंदणीसह) | ₹60,000 |
बालरोगतज्ज्ञ | 1 | MD (Paed)/DCH/DNB | ₹75,000 |
साथ रोग तज्ञ | 1 | MPH/MHA/MBA in Health | ₹75,000 |
स्टाफ नर्स | 8+1 | GNM/B.Sc नर्सिंग | ₹34,800 |
फार्मासिस्ट | 1 | D.Pharm/B.Pharm + नोंदणी | ₹20,800 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 3 | B.Sc + DMLT | ₹18,700 |
आरोग्य सेवक | 25 | 12वी पास + आरोग्य सेवक प्रशिक्षण/सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | ₹18,000 |
यातील काही पदांच्या थेट मुलाखती होणार असून काही पदांच्या गुणानुक्रमे निवड याद्या जाहीर केल्या जाणार आहेत त्याबाबत सविस्तर जाहिरात पहा खाली जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यातच तुम्हाला ऑफलाइन अर्जाचा नुमणा देण्यात आला आहे.