अहिल्यानगर जिल्हा कोतवाल भरती २०२५

अहिल्यानगर जिल्हा कोतवाल भरती २०२५

(सर्व तालुक्याच्या जाहिराती प्रसिद्ध)

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध सजातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या  असून अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ahilyanagar kotwal bharti 2025

महाराष्ट्र शासनाकडील पत्र क्रमांक संकीर्ण-२०२३ प्र. क्र.१७ /ई-१० दिनांक १७  मे २०२३ अन्वये सन २०२५ महसूल सेवक (कोतवाल) पद भरती बाबत महसूल सेवक संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोतवाल पदाच्या एकूण इतक्या १५८ जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव:- महसूल सेवक (कोतवाल)
जिल्ह्यात भरली जाणारी एकूण पदे:- १५८
ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात ०८/०७/२०२५
अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८/०७/२०२५  रात्री २३:५९ पर्यंत
महसूल सेवक ( kotwal salary ) पदाचे मानधन दरमहा १५०००/- रुपये
वयाची अट:- १८ ते ४०
परीक्षेचे शुल्क
खुला प्रवर्ग ६००/- रुपये        मागास प्रवर्ग ५००/- रुपये

जिल्ह्यातील तालुका निहाय  रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे

अ. क्र.

तालुका

जागा

जाहिरात

जामखेड

०६

येथे क्लिक करा

अहिल्यानगर शहर

१४

येथे क्लिक करा

कर्जत

१४

येथे क्लिक करा

कोपरगाव

१०

येथे क्लिक करा

नेवासा

१०

येथे क्लिक करा

राहता

०७

येथे क्लिक करा

राहुरी

१२

येथे क्लिक करा

श्रीगोंदा

२०

येथे क्लिक करा

श्रीरामपूर

०८

येथे क्लिक करा

१० संगमनेर

१६

येथे क्लिक करा

११ पाथर्डी

१३

येथे क्लिक करा

१२ पारनेर

२१

येथे क्लिक करा

१३ शेवगाव

०७

येथे क्लिक करा

एकूण जागा

१५८

कोतवाल पदाचा ( kotwal bharti )ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती
  1. महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी उमेदवारांचे वय दिनांक ०७/०७/२०२५ रोजी १८ ते ४० या वयोगटातील असावे
  2. अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे त्याच सज्जातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील
  3. महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक करता चौथी पास इतकी असावी
  4. अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाची कर्तव्य पार पाडण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा
  5. मागासवर्गीय उमेदवारांनी पुरावा म्हणून सक्षम प्राधिकार यांनी दिलेले जात प्रमाणपत्र छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल
  6. उमेदवाराचा चारित्र्य स्वच्छ असाव त्याच्याविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी
  7. महसूल सेवक कोतवाल पदासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेत किमान ४०  गुण मिळवणे आवश्यक असेल

उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी कामीतात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच कागदपत्रे तपासणी अंती  अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप

लेखी परीक्षेसाठी 100 गुण असतील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल प्रश्न संख्या 50 असतील, महसूल सेवक (कोतवाल) पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी>> येथे क्लिक <<करा.

टिप:- इतर महत्त्वपूर्ण अटी व शर्ती पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या जाहिरातीचे अवलोकन करूनच ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top