पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2025 – भोर व मुळशी प्रकल्पांतर्गत संधी

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भोर आणि मुळशी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
भरती प्रकल्प:
प्रकल्प भोर – जाहिरात क्र. 01/2025, दिनांक: 25/06/2025
प्रकल्प मळुशी – जाहिरात क्र. 01/2025, दिनांक: 25/06/2025
पदांची माहिती:
प्रकल्प पदाचे नाव पदसंख्या
भोर अंगणवाडी सेविका 7 पदे
भोर अंगणवाडी मदतनीस 32 पदे
Mulasi anganwadi bharti 2025
मुळशी अंगणवाडी सेविका 2 पदे
मुळशी अंगणवाडी मदतनीस 13 पदे
एकूण – 54 पदे
कुठल्या गावात अंगणवाडी मध्ये पदे भरली जाणार आहेत हे पाहण्यासाठी जाहिरात पहा
शैक्षणिक पात्रता:
इयत्ता 12वी उत्तीर्ण (किमान)
अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे.
आवश्यक अटी व पात्रता:
अर्जदार महिला असणे आवश्यक.
अर्जदार त्या महसुली गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक (तहसीलदार यांचा रहिवासी दाखला अनिवार्य).
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे, विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षे पर्यंत सवलत.
लहान कुटुंबाचा दाखला (जास्तीत जास्त 2 अपत्य) सादर करणे आवश्यक.
विधवा किंवा अनाथ महिलांना 10 अतिरिक्त गुण दिले जातील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत: 9 जुलै 2025 (सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत)
मानधन व सेवा अटी:
ही पदे मानधनाधिष्ठित असून शासकीय सेवेसारख्या कोणत्याही सवलती लागू नाहीत.
सेवा समाप्ती वय: 60 वर्षे किंवा कार्यक्षमतेनुसार.
बदलीस संधी नाही, पदस्थापना त्या-त्या गावातच.
⚠️ महत्वाच्या सूचना:
अर्ज फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून अपलोड करणे आवश्यक.
कोणत्याही टप्प्यावर चुकीची माहिती आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवले जाईल.
उमेदवाराने कोणतीही खाजगी नोकरी किंवा राजकीय सहभाग टाळावा.
नोट: अर्ज करताना योग्य माहिती आणि कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करावी. भरती प्रक्रियेतील कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी भेट द्या:
https://zppune-wcd.chanakyasoft.com