वसई विरार महानगरपालिका भरती २०२५ – डॉक्टर, स्टाफ नर्स,आरोग्य सेवक,फार्मासिस्ट,प्रयोगशाळा तंत्रज्ञ

वसई-विरार महापालिकेत वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्णसंधी: विविध पदांसाठी थेट मुलाखती

NUHM recruitment Maharashtra 2025

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) विविध वैद्यकीय पदांच्या भरतीसाठी एक मोठी भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या भरतीत MBBS, BDS, आयुष, GNM, B.Sc नर्सिंग, D.Pharm, B.Pharm, DMLT आणि विविध इतर आरोग्य विषयक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची ११० इतकी पदे भरली जाणार आहेत.

पदांचा खालीलप्रमाणे तपशील आहे

उपलब्ध पदे आणि आवश्यक पात्रता:

अर्ध वेळ / पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी अनुक्रमे २० आणि १३ जागा आहेत इतर पदांची माहिती खालील प्रमाणे.

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता मानधन (रु.)
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 37 MBBS (MCI/MMC नोंदणीसह) ₹60,000
बालरोगतज्ज्ञ 1 MD (Paed)/DCH/DNB ₹75,000
साथ रोग तज्ञ 1 MPH/MHA/MBA in Health ₹75,000
स्टाफ नर्स 8+1 GNM/B.Sc नर्सिंग ₹34,800
फार्मासिस्ट 1 D.Pharm/B.Pharm + नोंदणी ₹20,800
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 B.Sc + DMLT ₹18,700
आरोग्य सेवक 25 12वी पास + आरोग्य सेवक प्रशिक्षण/सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ₹18,000

यातील काही पदांच्या थेट मुलाखती होणार असून काही पदांच्या गुणानुक्रमे निवड याद्या जाहीर केल्या जाणार आहेत त्याबाबत सविस्तर जाहिरात पहा खाली जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यातच तुम्हाला ऑफलाइन अर्जाचा नुमणा देण्यात आला आहे.

मुलाखतीची माहिती:

  • दिनांक: 28 मे 2025 आणि 5 जून 2025

  • वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 3:00

  • स्थळ: हॉल नं. 01, वसई-विरार महापालिका मुख्य कार्यालय, वसई (पूर्व)

महत्वाच्या सूचना:

  • मुलाखतीस उपस्थित राहताना मूळ प्रमाणपत्रे, फोटो व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

  • ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने असेल.

  • सदर भरती संदर्भात इतर सर्व महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पदभरतीची जाहिरात पहावी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • उमेदवारांना www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवता येईल.

सुवर्ण संधी

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या या भरती प्रक्रियेत सहभागी व्हा आणि आपल्या सेवेतून समाजाला आरोग्यविषयक आधार द्या.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top