sarpanch upsarpanch mandhan vadh | सरपंच उपसरपंच मानधनात वाढ शासन निर्णय जाहीर !
सरपंच उपसरपंच मानधनात वाढ शासन निर्णय जाहीर !
sarpanch upsarpanch mandhanvadh 2024
महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशांकात झालेली वाढ, कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदान येथिल आंदोलनकर्त्यांना मा. मंत्री (ग्राम विकास) यांनी सरपंच व उपसरपंचांच्या मानधन वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनच्या अनुषगाने सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक ४ अनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत होते-
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी
|
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)
|
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)
|
शासन अनुदान टक्केवारी
|
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम
|
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम |
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती
|
३,०००/-
|
१,०००/-
|
७५%
|
२,२५०/-
|
७५०/- |
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती
|
४,०००/-
|
१,५००/-
|
७५%
|
३,०००/-
|
१,१२५/- |
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती
|
५,०००/-
|
२,०००/-
|
७५%
|
३,७५०/-
|
१,५००/- |
शासन निर्णय -
ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरंपचाना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.
sarpanch mandhanvadh upsarpanch mandhanvadh
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी |
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)
|
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)
|
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम
|
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम |
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती |
६,०००/-
|
२,०००/-
|
४,५००/-
|
१,५००/- |
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती
|
८,०००/-
|
३,०००/-
|
६,०००/-
|
२,२५०/- |
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती |
१०,०००/-
|
४,०००/-
|
७,५००/-
|
३,०००/- |
०२. सरपंच व उपसरपंच याना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलेल व उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देईल.
०३. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील. तसेच पुर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील.
०४. सरपंच व उपसरपंच मानधनाचा खर्च मागणी क्रमांक एल-२, प्रधानशिर्ष-२०५३-जिल्हा प्रशासन, ०९३-जिल्हा आस्थापना- (०७) (०१)-ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचा- यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने (२०५३ १०४२)-३१-सहायक अनुदान याखाली खर्च करण्यात येईल.
०५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६०१/२०२४/व्यय-१५, दि.०५/०९/२०२४५ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Post a Comment