जिल्हा परिषद पदभरती 2023 पेसा चे निकाल या तारखेपर्यंत होणार जाहीर !
![]() |
Zp Pesa result 2023 |
👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈 |
👉नांदेड झेडपी आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 👈
जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये विविध संवर्गाच्या पदभरतीची जाहिरात आलेली होती आणि त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आलेले होते त्या विविध संवर्गाच्या परीक्षा वेगवेगळ्या तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या होत्या पेसा बाबतची केस न्यायालयात होती म्हणून बिगर पेसा आणि पेसा असं वर्गीकरण करून बिगर पेसा असणारे जिल्हे आणि पदांच्या परिक्षा पहिल्या टप्प्यात घेण्यात आल्या नंतर पेसा अंतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातही बिगर पेसाच्या जागा होत्या तर त्या जागांच्या परीक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेले होत्या आणि शेवटी पेसा अंतर्गत येणारी पदे आणि त्या अंतर्गत जिल्हे यांच्या परीक्षा शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या आता या तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षांचा निकाल कधी लागेल त्याबद्दल परिपत्रक निघाले आहे.
जिल्हा परिषद पेसा निकाल परिपत्रकानुसार
जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती 2023 – सुचना
1. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हापरिषद मधील विगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 508 (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदांचा निकाल दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल.
2. दि.29 व 30 जुलै, 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे परिक्षा देवू न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परिक्षा दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन सदर परिक्षेचा निकाल दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल.