Post Office Bharti 2025 | भारतीय डाक विभागात २१००० जागांसाठी मेगाभरती जाहिरात आली | ऑनलाईन अर्ज भरण्यास झाली सुरुवात.
भारतीय डाक विभागात मेगाभरती २०२५
२१००० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध !
ऑनलाईन अर्ज भरण्यास झाली सुरुवात.
![]() |
POST OFFICE BHARTI 2025 |
ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत यात शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक या पदांच्या देशभरात २१ हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. देशभरातील पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरती साठी लेखी परीक्षा होणार नसून उमेदवारांची इयत्ता १० वी मध्ये प्राप्त गुणांच्या टक्केवारी नुसार निवड करण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात १४०० पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत.सुशिक्षित बेरोजगरांसाठी ही एक चांगली संधी आहे.
पदाचे नाव
१} पोस्टमास्टर (BPM)
(मानधन- १२,००० ते २९,३८०)
२} सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक
(मानधन- १०,००० ते २४,४७०)
Post a Comment