Anganwadi Bharti 2025 Maharashtra | भरतीला झाली सुरुवात ! पहा सर्व जिल्ह्याच्या जाहिराती.

 

अंगणवाडी भरती २०२५ प्रक्रियेला झाली सुरूवात ! 

१०००० जागा भरल्या जाणार.  

पहा सर्व जिल्ह्याच्या जाहिराती एकाच ठिकाणी

Anganwadi Bharti 2025

 

पोस्ट ऑफिस भरती २०२५ - २१००० जागा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात येथे क्लिक करा.

महिला व बालविकास विभागामार्फत शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत  अंगणवाडी भरती प्रक्रिया सन २०२५ ला सुरुवात झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील अंगणवाडीतील रिक्त पदासाठी  मानधनी तत्वावर सरळ नियुक्तीने  (By Nomination) जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अटी व शर्ती खालील प्रमाणेः

1. शैक्षणिक पात्रताः अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इ. 12 वीचे गुणपत्रकाची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असुन सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने अर्जात दर्शविलेल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सांक्षाकित करुन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

2. वास्तव्याची अट:-उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी. स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील अर्जदार महिला रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणुन शासकिय दस्ताऐवज (जसे रेशनकार्ड/मतदान कार्ड/वीज देयक/दूरध्वनी देयक/घरपट्टी इ.) जोडणे आवश्यक आहे.

3. वयाची अट:-अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल. तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल. त्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10 वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहिल. उमेदवाराचे किमान व कमाल वय (दि. 18/02/2025) रोजीच्या दिनांकास गणण्यात येईल.


4. लहान कुटुंब:- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागु राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबावतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.


5. मराठी भाषेचे ज्ञानः रिक्त पदांचा तपशिल दर्शविणाऱ्या तक्ता अ ते इ मधील सर्व अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे इ. 10 वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

6. उमेदवार विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे पतीचे मृत्यु प्रमाणपत्र जोडावे.

7. उमेदवार अनाथ असल्यास :- संबंधित विभागीय उप-आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे.

8. मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावा.

9. अनुभव :- उमेदवारास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंगणवाडी मदतनीस म्हणुन कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. असा अनुभव उमेदवारांस असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवी, अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही व याबाबतचा कोणताही युक्तीवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

मानधन 

अंगणवाडी सेविका :- १५०००/-

अंगणवाडी मदतनीस :- ७५००/-


maharashtra anganwadi bharti 2025 arj 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन 

अर्ज स्विकारण्याचा कालावधी :-  खाली देण्यात आलेल्या जिल्हानीहाय जाहिराती पहाव्यात

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
:- खाली देण्यात आलेल्या जिल्हानीहाय जाहिराती पहाव्यात

अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी
:- खाली देण्यात आलेल्या जिल्हानीहाय जाहिराती पहाव्यात

अर्ज सादर करण्याचा पत्ता -

खाली देण्यात आलेल्या जिल्हानीहाय जाहिराती पहाव्यात

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः (सत्यप्रतीत जोडणे आवश्यक)anganwadi bharti 2025 documents
 

१) विहीत नमुन्यातील व स्वहस्ताक्षरातील फोटो लावलेला अर्ज
२) रहिवाशा पुरावा
(रेशनकार्ड/ मतदान कार्ड/वीज देयक /दूरध्वनी देयक/ घरपट्टी इ. पैकी कोणतेही एक)
३) शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे
(इयत्ता १० वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
इयत्ता १२ वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
डिएड चे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
बीएडचे गुणपत्रक व प्रमाणपत्र,
MS-CIT प्रमाणपत्र)

४) वयाचा पुरावा-

1. १० चे बोर्ड सर्टिफिकेट
ii. जन्म दिनांक नमुद असलेला शाळा/महाविदयालय सोडल्याचा दाखला
iii. नगरपालिका/महानगरपालिका/ग्रामपंचायतीचा जन्म दाखला,
५) विधवा व अनाथ मुलीचे प्रमाणपत्र (असल्यास):-
६) विवाह दाखला
पतीचा मृत्यु प्रमाणपत्र
पुर्नविवाह न केल्याचे प्रतिज्ञापत्र

७) जात प्रमाणपत्र /जातीचा दाखला (लागु असल्यास)

८) अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव
असणा-या अनुभवाचा दाखला (असल्यास)

९) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र

अंगणवाडी भरती २०२५ खाली जिल्हानीहाय जाहिराती पाहण्यासाठी जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.

ahilyanagar anganwadi bharti 2025 - 1 

अहिल्यानगर 2

अहिल्यानगर 3

solapur anganwadi bharti 2025

nashik anganwadi bharti 2025

sangli anganwadi bharti 2025

Buldhana anganwadi bharti 2025 

washim anganwadi bharti 2025 

washim anganwadi bharti 2025 shudhdipatrak

amravati anganwadi bharti 2025 west 

amravati anganwadi bharti 2025 east

amravati anganwadi bharti 2025 south

gadchiroli anganwadi bharti 2025

latur anganwadi bharti 2025



 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.