ADCC BANK RESULT | ADCC बँक भरती २०२५ निकाल ! मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर.
ADCC बँक भरती २०२५ निकाल जाहीर !
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर.
क्लर्क, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक
अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी बँकेद्वारे दिनांक १२.९.२०२४ रोजीच्या दैनिक 'सकाळ' व 'लोकमत' या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून जाहिरातीतील क्लर्क, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक ही पदे भरण्याकरीता व निवडसूची तयार करणेकामी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले. अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ९ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत पार पडल्या. पुढे परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उत्तर तालिका उपलब्ध करून दिल्यानंतर शेवटी आज मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Post a Comment