Vruddh Kalavant Mandhan Yojana | राजर्षि शाहू महाराज जेष्ठ कलावंत मानधन योजना.
राजर्षि शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना.
आता कलावंतांना मिळणार ५००० मानधन
पहा सुधारित योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती
काय आहे योजना?
vruddh kalavant mandhan yojana 2024
"राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन" राज्य शासनामार्फत सन १९५४-५५ पासून राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थी हे संपूर्णपणे कला-साहित्य या क्षेत्राशी निगडीत असून त्यावर त्यांची उपजिविका अवलंबून आहेत. मान्यवर वृध्द साहित्यिक व कलाकार योजनेतंर्गत विभागाच्या उपर्निर्दिष्ट क्र. २ येथील शासन निर्णयान्वये कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्यात आली होती. वयोवृध्द साहित्यिक व कलाकारांची संख्या विचारात घेता, सद्यःस्थितीत १०० इष्टांक आहे. मान्यवर वृध्द साहित्यिक व कलाकार मानधनात दीडपट वाढ करुन सुमारे ५ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. सद्यस्थितीत मागील ५ वर्षाच्या कालावधीतील महागाईचा वाढता निर्देशांक पाहता तसेच, मा. लोकप्रतिनिधी, कलावंत तसेच विविध कलाकार संघटना यांचेकडून मान्यवर वृध्द साहित्यिक व कलाकार यांच्या मानधनात वाढ करण्याची शासनाकडे आग्रहाची मागणी होत आहे, ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व कलाकार यांचे कार्य या दोन्ही क्षेत्रांसाठी समर्पित असल्याने अशा साहित्यिक/कलाकार यांना श्रेणीनिहाय तुलना करणे उचित नसल्याची मागणी सातत्याने केली जात होती. सरसकट एकच श्रेणी सर्व कलाकारांना लागू केल्यास वृध्द कलाकारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन जीवनमान उंचाविण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली जात होती. त्यांच्या पुढील पिढीस एक आत्मविश्वास निर्माण होऊन लुप्त होत चाललेल्या राज्याच्या काही सांस्कृतिक कलाकृती यांचे जतन व संवर्धन करण्यास मदत होईल. तसेच, या योजनेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व नियमांमध्ये सुसुत्रीपणा आणणे आवश्यक असल्याने याप्रकरणी पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक अशी एकच सुधारीत नियमावली तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे शासन निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
काय आहे सुधारित शासन निर्णय ?
दिनांक १६ मार्च, २०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्य झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलांमध्ये पूर्णवेळ चरित्रार्थ अवलंबून असलेले कलाकार यांना मानधन मंजूर करण्याबाबत या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित नियमावली मंजूर करण्यात येत आहे.
०२. योजनेचे नाव : "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना"
०३. कलाकार व साहित्य :
कलाकार जे कलाकार १५ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (performing art) सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील.
साहित्यिक- जे साहित्यिक १५ वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक. कलाक्षेत्राशी निगडीत लेखन / समीक्षा करता अशा साहित्यिकांचा या योजनेसाठी पात्र असतील.
०४. मानधन :
कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये ५,०००/- इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन लाभार्थ्यांस तहहयात मिळेल. त्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी नव्याने जिल्हास्तरीय समितीस कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
सदर मानधन लाभार्थ्यांना डीवीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तसेच, सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक १ एप्रिल, २०२४ पासून करण्यात येईल.
०५. पात्रता :
१. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहेत. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्षे)
२. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे.
३. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे.
४. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/ दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील.
५. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
६. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार.
७. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार.
८. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी निवडीबाबतचे वेळापत्रक
rajarshi shahu maharaj vruddh kalavant mandhan yojana
दरवर्षी जून महिन्यात :- स्थानिक वर्तमानपत्रांमधून जाहिरात
जुलै:- अर्ज मागविणे.
ऑगस्ट व सप्टेंबर :- अर्जाची छाननी करणे तसेच त्रुटीच्या अर्जाना त्रुटीपूर्तता करण्यास संधी देणे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर :- समितीच्या बैठका घेऊन लाभार्थी कलाकारांच्या नावाची निश्चिती करणे.
डिसेंबर :- निवड समितीने इतिवृत्त संचालनालयात नावांच्या यादीसह या कार्यालयास कळविणे.
जानेवारी ते मार्च :- संचालनालयाने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सदरील कलाकारांच्या मानधनाच्या निधीची तरतूद करणे.
पुढील आर्थिक वर्षाच्या माहे एप्रिल पासून :- मानधन सुरु करणे.
अर्ज कसा करावा ?
जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जदारास अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक असेल. यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच, लाभार्थ्यास अदा करण्यात येणारे मानधन डीबीटीद्वारे अदा करण्यात येईल.
अर्जासोबत खालील कागपत्रांचा समावेश असेल
vruddh kalavant yojana documents
१) वयाचा दाखल
२) आधार कार्ड
३) उत्पन्नाचा दाखला
४) रहिवासी दाखला
५) प्रतिज्ञापत्र
६) पति व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)
७) बँक तपशील बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक.
८) अपंगत्व दाखला (लागू असल्यास)
९) राज्य/ केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१०) नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास)
११) विविध पुरावे.
vruddh kalavant yojana website link
Post a Comment