Vasantrao naik tanda sudhar yojana | वसंतराव नाईक तांडा सुधार योजना.

वसंतराव नाईक तांडा सुधार योजना.

काय आहे योजना? किती मिळते अनुदान? 

महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती जमाती अजूनही भटकंती करुन स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे/वस्त्या असून अशा तांडयांमध्ये या जमाती अनेक वर्षांपासून रहात असल्या तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य समाज गरीबीचे जीवन जगत आहे. त्यासाठी तांडे, वाडी किंवा वस्त्या यामध्ये या समाजास स्थिर जीवन जगता यावे याकरिता सुधारणा होणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या वसाहतीत “दलित वस्ती सुधारणा योजना” सन १९७२ पासून राबविण्यात येत आहे व या योजनेची फलश्रुती चांगली असल्याचे मूल्यमापनात आढळून आले आहे. ही बाब विचारात घेऊन दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर राज्यातील भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. 

राज्यात अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या “दलित वस्ती सुधारणा योजना” या योजनेच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग याकरिताही त्यांच्या वस्तीमध्ये विद्युतीकरण, रस्ते, शौचालय, पिण्याचे पाणी, वाचनालय इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविल्या जाते. 

लोकसंख्येनुसार किती मिळते अनुदान? 


अनुदान रक्कम (रु.लक्ष)
५० ते १०० लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या
४ लक्ष
१०१ ते १५० लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या
६ लक्ष
१५१ पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या
१० लक्ष

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top