लातूर झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी मिळणार ऑर्डर्स (नियुक्ती आदेश)
latur zp सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत आय.बी.पी.एस. कंपनी कडून प्राप्त झालेल्या आरोग्य सेवक महिला या पदाच्या निकालाची गुणवत्ता यादी www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर दि. 16.7.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा निवड समिती लातूर यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दि.20, 21 व दिनांक 22.8.2024 रोजी सकाळी 11.00 वा आरोग्य सेवक महिला पदासाठी गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागद पत्रे व इतर आवश्यक सर्व दस्ताऐवज तपासणी करण्यात आली त्याच प्रमाणे आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के या पदाच्या निकालाची गुणवत्ता यादी www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर दि.9.7.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा निवड समिती लातूर यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दि.20, 21 व दिनांक 22.8.2024 रोजी सकाळी 11.00 वा आरोग्य सेवक महिला पदासाठी गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागद पत्रे व इतर आवश्यक सर्व दस्ताऐवज तपासणी करण्यात आली..
latur zp arogya sevak order
आरोग्य सेवक ४०% आणि आरोग्य सेवक महिला पदासाठी गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागद पत्र पडताळणी अंती आरोग्य सेवक ४०% आणि आरोग्य सेवक महिला पदाची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली आहे. सदर अंतिम निवड यादीतील उमेदवारांना पदस्थापना देणेसाठी दिनांक 7.10.2024 रोजी दुपारी 1.30 वाजता कै. शिवाजीरराव पाटील निलंगेकर सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे समुपदेशन ठेवण्यात आले आहे.
तरी आपण समुपदेशनासाठी न चुकता उपस्थित रहावे. जे उमेदवार समुपदेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत त्यांना प्रशासकीय गरज लक्षात घेवून पदस्थापना देण्यात येईल व देण्यात आलेल्या पदस्थापनेत कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही याची गांभिर्याने नोंद घ्यावी अशी माहिती सुचनापत्रक काढून कळवण्यात येत आहे.