Dharashiv arogya Sevika final nivad yadi | धाराशिव झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर !


 धाराशिव आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर! 

👉आरोग्य सेविका बीड झेडपी अंतिम निवड यादी

जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी दिनांक- 16.06.2024 रोजीची Online परिक्षा व दिनांक 04/09/2024 रोजी झालेली कागदपत्र पडताळणी व बायोमेट्रीक (Biometric) व आयरिस (Iris) कॅप्चर प्रक्रिया तसेच दि.16/09/2024 रोजी पात्र/अपात्र उमेदवारांचे प्रसिध्द यादीबाबत प्राप्त आक्षेप/हरकती अंती आरोग्य सेवक (महिला) पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी अंतिम निवड सूची आज जाहीर करण्यात आली आहे. 

dharashiv zp arogya sevika antim nivad yadi

आरोग्य सेवक (महिला) पदांसाठी विविध प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणासह भरावयाच्या एकुण 178 पदासाठी केवळ 51 इतके पात्र उमेदवार उपलब्ध झालेले आहेत. आरोग्य सेवक (महिला) यामध्ये खुला समांतर आरक्षणांतर्गत अनुक्रमे खेळाडु-4 प्रकल्ग्रस्त -4, भुकंपग्रस्त 1 व अंशकालीन कर्मचारी 7 पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदरील पदे ही शासन निर्णय दिनांक 15 मे 2023 मधील निर्देशाप्रमाणे खुला (सर्वसाधारण) या प्रर्वातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधुन भरण्यात आलेली आहेत.

आरोग्य सेवक (महिला) या संवर्गामध्ये अनुक्रमे अनुसुचित जाती - 4, अनुसुचित जमाती – 2 विजाअ 1, भजब 1, भजड 1, इमाव 5, आदुघ- 3 व खुला 11 अशी एकुण 28 पदे माजी सैनिक यांचेमधुन भरणेसाठी राखीव ठेवण्यात आलेली होती. तथापी संपुर्ण गुणवत्ता यादीमध्ये सदर पदासाठी एकही माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णय दिनांक 16 एप्रिल 1981 नुसार सदरील विविध प्रवर्गातील 28 माजी सैनिक पदांचा अनुशेष पुढील भरती वर्षासाठी ओढण्यात येत आहे.

 आरोग्य सेवक (महिला) या संवर्गामध्ये अनुक्रमे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विजाअ, भजब, भजड, विमाप्र, इमाव व आदुघ यामध्ये समांतर आरक्षण व समांतर आरक्षणाशिवाय भरावयाच्या पदासाठी गुणवत्ता यादी प्रमाणे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदरील पदे भरण्यात आलेली नाही.

 महाराष्ट्र शासन, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं- 1222/प्र.क्र.54/का.13-अ दिनांक 4 मे 2022 मधील अ.क्र.11 (अ) नुसार निवडसूचीची कालमर्यादा निश्चित करुन देण्यात आलेली असल्याने त्याप्रमाणे आरोग्य सेवक (महिला) या पदाची अंतिम निवडसूची ही पुढील 1 वर्षासाठी विधिग्राहय राहील.

osmanabad zp arogya sevika final nivad yadi

महाराष्ट्र शासन, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं-1222/प्र.क्र.54/का. 13-अ दिनांक 4 में 2022 मधील 11(ब) प्रमाणे निवड समितीने तयार केलेल्या निवडसूचीमधून जेष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार, किंवा जात प्रमाणपत्र/अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची अनुपलब्धता/अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीने त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त (प्रतिक्षा सूचीवरील) उमेदवारांमधून वरीष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने निवडसूचीच्या कालमर्यादेत भरण्यात येतील. 

आरोग्य सेवक (महिला) संवर्गाची रिक्त पदे भरणेसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम निवडसूची प्रसिध्द करुन अंतिम निवडयादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबत जिल्हा निवड समितीने सर्वानुमते मान्यता दिली.लवकरच उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. 

Dharashiv zp ANM final selection list

अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.