mukhyamantri mazi ladaki bahin yojana | योजना अंमलबजावणीत मोठा बदल !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत मोठा बदल नवीन शासन निर्णय प्रसिद्ध.
* अर्ज करण्यास मुदतवाढ.
*आता अर्ज फक्त यांच्याकडेच करता येणार!
mukhyamantri mazi ladaki bahin yojana |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणभागात योजना राबावण्याबत एक शासन निर्णय दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये योजने पासून अद्याप वंचित महिलाना या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच योजना राबण्याबाबतीत एक मोठा बदल करण्यात आला असून या मध्ये या पूर्वी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे जे अधिकार ११ प्राधिकरीत व्यक्तींना देण्यात आले होते त्यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत पूर्वी अर्ज स्वीकारण्याची परवानगी ही नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी/बालवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका,सेतु सुविधा केंद्र,अंगणवाडी पर्यवेक्षीका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांना देण्यात आलेली होती, आता अंगणवाडी सेविका सोडून इतर प्राधिकृत व्यक्तिकडून हे अधिकार काढून घेण्यात आले असून माहे सप्टेंबर २०२४ मध्ये या योजनेसाठी आता अर्ज फक्त अंगणवाडी सेविका याच स्वीकारतील अशा प्रकारचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या योजनेपासून अद्याप वंचित महिलानी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हे शहरी तसेच ग्रामीणभागात अंगणवाडी सेविका यांच्याकडेच सादर करावेत.
Ladaki bahin yojana online form
Post a Comment