BMC Clerk Recruitment 2024 | 1846 जागा ऑनलाईन अर्ज सुरू.

 बृहन्मुंबई महानगरपालिकेत मेगा भरती क्लर्क पदाच्या 1846 जागा ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात. 

BMC clerk recruitment 2024

👉१० वी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उतीर्ण अट रद्द 👈

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मेगा भरती ला सुरुवात झाली असून क्लर्क या पदाच्या 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीएफ/एफ/3604 दि.24.06.2024 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील "कार्यकारी सहायक" (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर 'कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन अर्ज' या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत."कार्यकारी सहायक" या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.


सरळसेवेने भरावयाच्या "कार्यकारी सहायक" (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे:-


पदाचे नाव :- कार्यकारी सहायक


वेतनश्रेणी (सुधारित) :- स्तर-M15- रु.25,500-81,100


भरावयाच्या रिक्त पदांची संख्या :- 1846


(3) "कार्यकारी सहायक" या पदाची अर्हता.


१)


(i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.


आणि


(ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.


किंवा


(iii) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


7 Point Grading System (CB GS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापिठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल.


• तसेच, 10 Point Grading System (CB CS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी पुढील सुत्राप्रमाणे गणण्यात येईल.


टक्केवारी (%) = 7.1 X CGPA (Cumulative Grade Point Average) + 11. टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात


२)


गणण्यात येईल. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.


3) 


४)


उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.


(1) उमेदवाराजवळ 'एम.एस.सी.आय.टी' परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस / 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 आणि शासन पुरकपत्र क्र. मातंस / 2012/प्र.क्र.277/39 दि.08.01.2018 तसेच, शासन पुरकपत्र क्र. मातंस / 2012/प्र.क्र.277/39 दि.16.07.2018 मध्ये नमूद केलेल्या संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील.


(II) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.


ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी

20 ऑगस्ट 2024 ते 09 सप्टेंबर 2024


वयोमर्यादा.


जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा.


अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी

किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे


ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी

किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे


ऑनलाइन परिक्षा शुल्क.


ऑनलाइन परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आकारले जाईल.


अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता

रु.1000/- (वस्तु व सेवाकरासह)


'मागास प्रवर्गातील' उमेदवारांकरिता

रु.900/- (वस्तु व सेवाकरासह) 


सविस्तर जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

BMC clerk online application

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.