Talathi Result 2023 | सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर !
सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर !
तर काही उमेदवारांचे निकाल राखीव.
Talathi bharti 2023 result
Talathi Bharti 2023 Revised Score List
सुधारित गुणवत्ता यादीबाबत प्रसिद्धीपत्रक खालील प्रमाणे.
तलाठी पदभरती २०२३ साठी tcs कंपनी कडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर आलेल्या आक्षेपावर tcs कंपनी कडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध मा. उच्च न्यायालयाने दि. १३/०२/२०२४ रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे. या निर्देशानुसार कळविण्यात येते की, तलाठी पदभरती करीता परीक्षा tcs कंपनी कडून एकूण ५७ सत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती,त्यानंतर कंपनी कडून उत्तर तालिका जाहीर करून उमेदवारांकडून त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते त्या आक्षेपावर आता पुन्हा पुनर्विलोकन करण्यात आले असून त्या बरोबरच कंपनी कडून पुनर्विलोकनानंतर ७९ प्रश्नमध्ये उत्तरसूची /प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप मान्य करून त्यानुसार आता प्रश्न / उत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नमध्ये / त्यांच्या उत्तर सूची मध्ये बदल करण्यात येत आहेत. एकूण ३९ प्रश्नांचे उत्तर दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नाचे गुण सत्रातील सर्व उमेदवारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे.
सदर २१९ प्रश्नतील बदलानुसार गुणवत्ता यादी मध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सोबत ३६ जिल्ह्यांच्या जिल्हानीहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले असून त्यांची जिल्हानीहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सोबत ११ अशा उमेदवारांची जिल्हानीहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचे बाबत शासनस्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल.
सर्व जिल्ह्याच्या सुधारित गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 महाराष्ट्र पोलिस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या 👈
तलाठी सुधारित गुणवत्ता यादी परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 ZP RESULT 2023 👈
Post a Comment