Namo Shetkari yojan 2024 2nd Installment
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार.
Namo Shetkari Yojana 2024 |
NAMO SHETKARI MAHASANMAN NIDHI YOJANA
सन २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ३ हप्त्यात [२००० रु. प्रती हप्ता ] ६००० रु. इतकी रक्कम राज्य शासनाच्या वतीने देण्याचे जाहीर करण्यात आले, आणि पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते. पहिल्या हप्त्यापोटी राज्य शासनाच्या माध्यमातून रु. १७२० कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT च्या माध्येमातून वितरित करण्यात आलेली होती.
ysd ykMdh ;kstuscnny ekfgrh feGo.;klkBh ;sFks fDyd djk-
आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी रु. १७९२ कोटी एवढी रक्कम मंजूर करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. माहे एप्रिल ते जुलै २०२३ साठी पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला होता दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ या कालावधीचा असेल आणि या हप्त्याचे वितरण २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे आपले स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
या बाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
Post a Comment