लेक लाडकी योजना - Lek Ladki Yojana Maharashtra | MAHITIADDA

 Lek Ladki Yojana Maharashtra - लेक लाडकी योजना   

काय आहे लेक लाडकी योजना ? कोणाला लाभ मिळणार ?

LEK LADKI YOJANA

* "माझी कन्या भाग्यश्री" ही योजना आता "लेक लाडकी योजना" नावाने राबविण्यात येत आहे *

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी आपल्या राज्यसरकारद्वारे  Lek Ladki Yojana सुरू करण्यात आली आहे. 

राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी, शिक्षणास चालना देण्यासाठी तसेच बालविवाह रोखणे,कुपोषण कमी करणे ई. उद्देश पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

कशाप्रकारे मिळणार लाभ ? 

मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार, ११ वीत  गेल्यावर ८ हजार, मुलीचे वय  १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार अशाप्रकारे त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार एवढा लाभ देण्यात येईल.

 कोणाला मिळणार लाभ ?

lek ladki yojana

पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मास येणाऱ्या मुलीस ज्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. 

शासनातर्फे या योजनेची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच DBT प्रणाली द्वारे लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. 

योजनेसाठी महत्वाच्या अटी शर्ती 

१} ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या मुलींसाठी असेल. 

२} ही योजना १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी असेल.

३} कुटुंबात १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ देण्यात येईल. 

४} दुसऱ्या प्रसूतिच्या वेळी २ मुली जन्मास आल्यास दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळेल.

५} योजनेचा लाभ घेण्यासाठी आई किंवा वडील यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 

६} कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत आसवे. 

७} लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. 

८}लाभार्थी बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक. 

आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजना

  योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्ज कुठे करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्या सोबत वरील कागदपत्रे जोडून आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे संबंधित अंगणवाडी सेविका तो फॉर्म ऑनलाईन भरतील तसेच कागदपत्रे अपलोड करतील.

अर्जाचा नमूना खालील प्रमाणे आहे. 

लेक लाडकी योजना

 या योजनेचा GR तसेच अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी 

येथे👉 क्लिक करा 

 

 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.