ITI ADMISSION 2023 | आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ सुरु

ONLINE ITI ADMISSION 2023 | आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ सुरु

ITI ADMISSION 2023

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI ADMISSION 2023 प्रक्रिया सोमवार दिनांक 12 जून 2023 पासून सुरू करण्यात आली आहे, इच्छुक उमेदवारांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत असे आव्हान व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक  डी.ए.दळवी यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे कळविले आहे.

 

 

औद्योगिक प्रशिक्षण [ ITI ] संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया संबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे इत्यादी प्रक्रिये बाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दररोज आयोजित करण्यात येत आहे. माहिती पुस्तकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या www.dvet.gov.in / https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर व प्रादेशिक कार्यालय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय व सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.


ITI ADMISSION 2023 प्रवेशाचे वेळापत्रक खालील प्रमाणे

ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे. 

[ 12 जून 2023 सकाळी 11 वाजेपासून 11 जुलै 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत ]


प्रवेश अर्ज निश्चित करणे:-

 अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत] मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित[ CONFIRM ] करणे.

[ 19 जून 2023 सकाळी 11 वाजेपासून 11 जुलै 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत ]

 

प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविणे

[ 13 जुलै 2023 सकाळी 11 वाजता. ]

 

ITI ADMISSION 2023 अधिक माहितीसाठी माहिती पुस्तिका पाहणे,  माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल त्या संदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळ www.dvet.gov.in व http://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय सर्व शासकीय खागी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा


 



 

 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.