TALATH BHARTI 2023 तलाठी भरती 2023

 तलाठी भरती 2023

 मित्रांनो तलाठी भरती 2023 बाबत एक महत्त्वपूर्ण पत्र जमावबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून उपयुक्त महसूल तथा विभागीय समन्वय अधिकारी कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि नागपूर या महसूल विभागांना सोबतच  तलाठी भरतीची परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीला  दिनांक 27-04-2023 रोजी एक पत्र पाठवण्यात आलं आहे.


या पत्राचा विषय आहे महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक गुरुवार दिनांक 04-05-2023 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केली आहे.


या पत्राचा सविस्तर मजकूर असा आहे

 

 उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील घटक संदर्भातील तलाठी पद भरतीच्या अनुषंगाने एकूण भरावयाची पदे, {जिल्हा निहाय व विभागनिहाय} परीक्षेची तारीख निश्चित करणे, पदभरतीची कार्यपद्धती तसेच अनुसूचित क्षेत्रातील पेसा रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इत्यादी बाबत सविस्तर आढावा घेणे कामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 04-05-2023 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

 तरी सदरआढावा बैठकीसाठी आपण आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित रहावे बैठकीची लिंक आपणास स्वतंत्ररीत्या पाठविण्यात येईल.

 

तर अशा प्रकारे वरील प्रमाणे पत्राचा मजकूर आहे तर लवकरच तलाठी भरती संदर्भात निर्णय घेतली जातील जाहिरात कधी येणार, परीक्षेची तारीख निश्चित करणे, पेसा बाबत निर्णय घेणे इ. बाबत अद्यावत आकडेवारी आढावा घेणे कामे ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आशा आहे की या बैठकीतून लवकरात लवकर सर्व बाबींवर निर्णय होऊन तलाठी भरतीला सुरुवात होईल.

 

"talathi-bharti-2023" 


राज्य शासनाने अमृत महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये 75 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे यात जिल्हा परिषद, महसूल विभाग तसेच इतर वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या 75 हजार जागांची भरती केली जाणार आहे. 


तलाठी पदाची परीक्षा घेण्यासाठी टीसीएस या कंपनीची निवड शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपण आशा करायला पाहिजे की या कंपनीच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सर्व बेरोजगार तरुणांना न्यायपूर्ण दिलासा देणारी असेल. 

 


 


Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.